Jalgaon News : जळगावच्या प्लॅस्टिक उद्योगाला युद्धाची झळ! कच्चा माल मिळेना, उत्पादन निम्म्यावर आल्याने उद्योजक चिंतेत

Global Conflict Impacts Plastic Industry in Jalgaon : पीव्हीसी पाइप, ठिबकच्या नळ्या आणि चटई ही उत्पादने करणारा प्लॅस्टिक उद्योग खूप मोठा आहे. या उद्योगासाठी वेगवेगळ्या स्वरूपातील प्लॅस्टिक कच्च्या मालाच्या स्वरूपात लागते.
 Plastic Industry

Plastic Industry

sakal

Updated on

जळगाव: शहरात व जिल्ह्यात पीव्हीसी पाइप, ठिबकच्या नळ्या आणि चटई ही उत्पादने करणारा प्लॅस्टिक उद्योग खूप मोठा आहे. या उद्योगासाठी वेगवेगळ्या स्वरूपातील प्लॅस्टिक कच्च्या मालाच्या स्वरूपात लागते. हा कच्चा मालच आता अमेरिका- इराणमधील व्यापक युद्धामुळे मिळेनासा झाला. उपलब्ध कच्च्या मालाच्या किमती गगनाला भिडल्याने एकूणच प्लॅस्टिक उद्योगांना मोठा फटका बसला असून, या तिन्ही उद्योगांचे उत्पादन निम्म्यावर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com