अन्‌ बंदोबस्तातून पोलिसांनी काढला पळ...काय आहे कारण वाचा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

मालेगाव शहरात पन्नास वर्षाचे पोलिस निरीक्षक व इतर वयस्क कर्मचारी नियमित ड्युट्या करीत असताना केवळ जळगावच्याच कर्मचाऱ्यांना त्रास असल्याच्या तक्रारी हे कर्मचारी करीत असल्याचे वरिष्ठांना निदर्शनास आले असून आठ तासांच्या ड्यूटी नंतर आठ तास रिलीफच्या काळात वरिष्ठांना कोणतीही पूर्व कल्पना न देता बेसकॅम्प जळगाव गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक कार्यालयाने कळवले आहे. 
 
जळगाव :- संपूर्ण महाराष्ट्र आपदेच्या परिस्थितीतून जात आहे.डॉक्‍टर पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्या वर कोरोना लढ्याची मदार असताना कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची गय नाही असा इशारा आता प्रशासनाने दिला आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव शहरात कर्तव्यावर असलेल्या शंभर पोलिस कर्मचाऱ्यांपैकी एक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असून अनेकांनी बेस कॅम्प सोडून पळ काढला होता. गैरहजर आढळलेल्या सहा पैकी तीन कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षकांनी निलंबन केले आहे. 

कोरोना हॉटस्पॉट चा बंदोबस्त सांभाळण्यासाठी विविध जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिस बल तैनात करण्यात आले आहे. जळगाव जिल्हापोलिस दलातील शंभर कर्मचारी मालेगाव बंदोबस्ताला पाठवण्यात आले आहे. बंदोबस्ताला 20 ते 40 वय वर्षातील नव्या दमाचे तंदुरुस्त कर्मचारी पाठवण्यात आले असून या कर्मचाऱ्यांना ऐश्‍वर्या लॉन येथे बेसकॅम्प दिला आहे. नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांतर्फे या कर्मचाऱ्यांची विविध ठिकाणी बंदोबस्त कामी ड्यूटी लावली असताना जळगावचे सहा पोलिस कर्मचारी गैर हजर असल्याचा अहवाल पोलिस अधीक्षक अनितासींग यांनी पाठवला होता. पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणी अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना चौकशीचे आदेश दिले होते, त्यात सुरेश रूपा पवार(मुक्ताईनगर पोलिस स्टेशन) प्रसाद सुरेश जोशी(मुख्यालय),सोनजी सुभाष कोळी( मुख्यालय)परवेझ रईस शेख(मुख्यालय)राहुल पाटील (शनिपेठ),राहुल घेटे(शनिपेठ) अशा सहा कर्मचाऱ्यांचा अहवाल पोलिस अधीक्षक जळगाव यांना पाठवला होता, त्यात सतत कामात कुचराई करणाऱ्या आणि गैरहजर राहून कुठलीही परवानगी न घेता मालेगावातून थेट जळगावी येणाऱ्या सुरेश रुपा पवार,प्रसाद सुरेश जोशी आणि परवेझ रईस शेख अशा तिघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. 

विनाकारण उपद्‌व्याप 
मालेगाव शहरात पन्नास वर्षाचे पोलिस निरीक्षक व इतर वयस्क कर्मचारी नियमित ड्युट्या करीत असताना केवळ जळगावच्याच कर्मचाऱ्यांना त्रास असल्याच्या तक्रारी हे कर्मचारी करीत असल्याचे वरिष्ठांना निदर्शनास आले असून आठ तासांच्या ड्यूटी नंतर आठ तास रिलीफच्या काळात वरिष्ठांना कोणतीही पूर्व कल्पना न देता बेसकॅम्प जळगाव गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक कार्यालयाने कळवले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon police on duty at malegaon