Jalgaon Police Welfare Scam
sakal
जळगाव: पोलिस दलाच्या दक्षता पेट्रोलपंपाचा व्यवस्थापक पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ (वय ५७) एक कोटी ३३ लाख ७५२ रुपयांच्या गैरव्यवहारानंतर पळून गेला. तो बेपत्ता झाल्यापासून पेट्रोलपंप बंदावस्थेतच असून, कर्मचारी हातावर हात धरून बसले आहेत. तर वाघ याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेली वरिष्ठ अधिकाऱ्यांची फळी आता कामाला लागली आहे. जानेवारीत ‘इन्स्पेक्शन’ झाले. मात्र काही विभागाची तपासणी बाकी असून, त्यात वेल्फेअरही बाकी असल्याचे पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी कळविले आहे.