Pune Flight
sakal
जळगाव: दसरा, दिवाळीच्या काळात पुण्याहून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी रेल्वे, एसटी तसेच ट्रॅव्हल्समध्ये वाढत असते. या काळात तिकिटाचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असतात. त्यात जळगाव विमानतळावरून जळगाव-पुणे विमानसेवा सुरू असून, दिवाळी घरी साजरी करण्यासाठी पुण्याहून जळगावला येणारे, तसेच दिवाळी झाल्यावर पुन्हा पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची पसंती विमानसेवेला दिसून येत आहे. महिनाभराअगोदर तिकीट बुकिंग जोमात सुरू असून, प्रवाशांची वाढती संख्या पाहता विमान कंपनीकडून तिकिटाच्या दरात वाढ करण्यात आली.