Jalgaon Accident : न्याय मिळाला, पण १८ वर्षांनी! रावेर अपघातातील जखमीला लोकन्यायालयात ₹२ लाख ३० हजार नुकसान भरपाई
18-Year-Long Legal Battle Ends in Lok Adalat : १८ वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर जळगाव लोकन्यायालयात रस्ता अपघातातील जखमीला नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली.
जळगाव: तब्बल १८ वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर लोकन्यायालयात जखमीला शनिवारी (ता. १३) नुकसान भरपाई मिळाली आहे. जखमी राजेंद्र उर्फ राजीव सुरेश लहासे यांचा २००७ मध्ये रावेर पोलिस ठाणे हद्दीत रस्ता अपघात झाला होता.