Jalgaon RTO Digital Fitness
sakal
उत्तर महाराष्ट्र
Jalgaon News : जळगाव आरटीओत डिजिटल क्रांती; खासगी कंपनीमार्फत होणार वाहन फिटनेस व ड्रायव्हिंग टेस्ट!
Digital Vehicle Fitness Centers in Jalgaon : जळगाव आरटीओत रोझमेर्टा कंपनीद्वारे उभारल्या जाणाऱ्या डिजिटल वाहन फिटनेस आणि ड्रायव्हिंग टेस्ट केंद्रामुळे नागरिकांना पारदर्शक, वेगवान आणि सुटसुटीत सेवा उपलब्ध होणार आहे.
जळगाव: राज्यभरातील वाहन फिटनेस तपासणी व ड्रायव्हिंग टेस्ट प्रक्रिया आता खासगी कंपनीच्या अत्याधुनिक यंत्रणेमार्फत राबविण्यात येणार आहे. मात्र, या प्रक्रियेवर नियंत्रण मात्र आरटीओ कार्यालयाचे राहणार आहे. याचाच एक भाग म्हणजे जळगाव येथे देखील याचा अवलंब होणार असून, यासाठी ‘रोझमेर्टा टेक्नॉलॉजी लि.’ या खासगी कंपनीला मक्ता मंजूर करण्यात आला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
