sand auction
sakal
जळगाव: जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून वाळू गटाचे लिलाव झालेले नाहीत. असे असले तरी जिल्ह्यात वाळू बांधकामे सर्रास सुरू आहेत. याचा अर्थ वाळूचोरी होते अन् ती बांधकामाच्या ठिकाणी जाऊन पडते. हा प्रकार दोन वर्षांपासून सुरू आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासनाने गेल्या २७ ऑक्टोबरला वाळूचे गटाचे लिलाव काढले होते. त्यास प्रतिसाद न मिळाल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा वाळू गटांचे लिलाव काढले आहेत.