Crime
sakal
जळगाव: शहरातील शाहूनगर भागात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची विक्री केली जाते. गेल्या दहा महिन्यांत जळगाव पोलिसांनी येथे तब्बल तीन वेळेस छापे टाकले. त्यात लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त झाले तर विक्रेत्यांना अटक होऊन आता ते जामिनावर बाहेर असून, गुन्हेगारीत पुन्हा सक्रिय झाले आहेत. अशाच एकाने भाईगिरीची रील तयार करून ती इन्स्टाग्रामवर व्हायरल केली होती. आज पोलिसांनी या ‘भाई’ शाहूनगर परिसरातून हात जोडलेल्या मुद्रेत वरात काढली.