जळगाव: प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत गेल्या दीड वर्षांत घरगुती ग्राहकांनी तसेच औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांनी सौर प्रकल्प छतांवर बसवून वीज निर्मितीत हातभार लावत आहेत. मात्र सौर प्रकल्प बसवून देखील ‘महावितरण’कडून मीटरची रीडिंग घेण्यात गोंधळ होत असल्याने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल येत आहे.