vegetable market
sakal
जळगाव: हिवाळ्यात शेतात मुबलक पाणी असल्याने भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघते. त्यामुळे हिवाळ्यात भाजीपालाचे दर कमी होतात. मात्र, शेतकऱ्यांना पालेभाज्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च लागत असतो. त्यात विविध बाजारात भाज्या विक्रीसाठी आल्यानंतर भाव कमी होतात. कमी भावातच भाजीपाला विक्री करावा लागतो. त्यामुळे केवळ येण्याजाण्याचा खर्च निघतो, अशी भावना भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केल्या.