दाराचे लॉक झाले खराब अन्‌ चार लाख लंपास 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 डिसेंबर 2019

जळगाव : जळगाव - औरंगाबाद महामार्गावरील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या मानराज मोटर्स शोरूममध्ये चोरी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. सुरक्षारक्षकांचे कडे भेदून व काही दिवसापूर्वी शोरूम मध्ये काचेचे दाराचे लॉक खराब झाल्याची संधी साधत दोन चोरट्यांनी शोरूममध्ये प्रवेश करून तिजोरीतील सुमारे चार लाखांची रोकड लंपास केली. 

जळगाव : जळगाव - औरंगाबाद महामार्गावरील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या मानराज मोटर्स शोरूममध्ये चोरी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. सुरक्षारक्षकांचे कडे भेदून व काही दिवसापूर्वी शोरूम मध्ये काचेचे दाराचे लॉक खराब झाल्याची संधी साधत दोन चोरट्यांनी शोरूममध्ये प्रवेश करून तिजोरीतील सुमारे चार लाखांची रोकड लंपास केली. 

औरंगाबाद मार्गावर औद्योगिक वसाहत परिसरात मानराज मोटर्स हे मारुती कारचे शोरूम आहे. शोरुमसह मुख्य कार्यालय, दुरुस्ती वर्कशॉप आणि पार्किंग असा मोठा परिसर असून, चार सुरक्षारक्षक नेमणुकीस आहेत. असे असताना सोमवारी रात्री 2:26 वाजेच्या सुमारास जिन्स पॅंट, निळा जर्किन एकाने ग्रे स्वेटर आणि दोघांनी तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेत कार्यालयात प्रवेश केला. कॅशिअर केबिनमध्ये शिरून कॅश काउंटरचा ड्रॉवर टॉमीने फोडून आतील 3 लाख 99 हजार 385 रुपयांची रोकड काढून तेथीलच कॅरीबॅगमध्ये टाकून चोरट्यांनी लंपास केली. जाताना चोरट्यांनी कार्यालयातील ड्रॉवरमधील नोकियाचा कॅमेराही चोरून नेला आहे. शोरूमचे व्यवस्थापक दिनेश भगीरथ पाटील यांनी तक्रार दिल्यावरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काचेच्या दाराचे लॉक खराब 
शोरुमच्या काचेच्या दाराचे लॉक गेल्या काही दिवसांपासून खराब झालेले असून, चोरट्यांनी याच दारातून प्रवेश करून चोरी केली आहे. 

सुरक्षारक्षकाला गुंगारा 
शोरूममध्ये कामासाठी येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या असून, रात्री एक सुरक्षारक्षक जागीच होता. चोरट्यांनी आत शिरण्यासाठी दोन कारमधील अंतरातून खाली बसून शोरूम गाठले. जेव्हा चोरटे कारमागून लपून चोरीसाठी शिरत होते, तेव्हा सुरक्षारक्षक त्याच परिसरात पहारा देत होता. मात्र, चोरटे त्याच्या नजरेस पडले नाही. चोरट्यांचे कारनामे "सीसीटीव्ही'त कैद झाले आहेत. 

सीसीटीव्ही फुटेज जप्त 
घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon for vhilar shourum robry