Viral Infection
sakal
जळगाव: यंदा उशिरा सुरू झालेल्या पावसाळ्यानंतर हवेतील आर्द्रता व तापमानातील चढ-उतारामुळे व सण उत्सवानिमित्त झालेल्या गर्दीमुळे संसर्गजन्य आजारांचे (व्हायरल इंफेक्शन) रुग्णांचे संख्या वाढली आहे. रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, ताप, आदी लक्षणे दिसून येत आहेत. यात लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश अधिक आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज ८० ते ९० रूग्ण, ताप, सर्दी खोकला या आजाराचे असतात. खासगी रुग्णालयात तर रात्री उशिरापर्यंत ओपीडी सुरू असल्याचे चित्र शहरासह जिल्ह्यात आहे.