Jalgaon Ward 5
sakal
जळगाव: शहराची मुख्य बाजारपेठ व राजकारणाचे केंद्र म्हणून प्रभाग क्रमांक पाचची ओळख आहे. नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे व राखी सोनवणे हे तिन्ही माजी महापौर या प्रभागाचे नेतृत्व करतात. तिघेही एकेकाळी शिवसेनेचे निष्ठावान होते. मात्र, मध्यंतरी शिवसेनेत उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटात झालेल्या फुटीचा थेट परिणाम या प्रभागाच्या राजकीय गणितांवर होऊन लढ्ढा भाजपत, तर भंगाळे शिवसेनेत गेल्याने मूळचा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागावर भाजपला वर्चस्व मिळविण्याची संधी दिसून येत आहे.