जळगाव- अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी गुरुवार (ता. ५)पर्यंत मुदतवाढ होती. ती संपल्याने अकरावी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची शुक्रवारी काही महाविद्यालयांनी यादी जाहीर केली. असे असले तरी अनेक विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली नाही. दुसरीकडे ते पोर्टल बंद आहे. त्यांना आता यापुढे अकरावीत प्रवेश कसे मिळतील, याबाबत पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शिक्षण मंडळाने तो दूर करून ऑफलाइन प्रवेशप्रक्रिया राबवावी व सर्वांना प्रवेश द्यावा, अशी मागणी होत आहे.