जळगाव: रक्षाबंधन सण आता केवळ पाच दिवसांवर आला आहे. म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाकडून प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता आतापासूनच जादा बसगाड्यांच्या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. आगारनिहाय प्रत्येक मार्गावर तीन ते चार जादा बसफेऱ्या वाढविल्या जाणार आहेत. त्यात लांब पल्ल्यांच्या मार्गावरदेखील जादा बसगाड्या धावणार आहेत.