Jalgaon Gold Price : लग्नसराईत सोने १ लाख २५ हजार पार! मंगळवारी एकाच दिवसात सोन्यात २ हजार, चांदीत ४,५०० रुपयांची वाढ
Sudden Surge in Gold and Silver Prices in Jalgaon : जळगावमध्ये लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या भावात मंगळवारी (ता. २५) अचानक मोठी वाढ झाली असून, सोने प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार रुपयांवर (विना जीएसटी) पोहोचले आहे.
जळगाव: जिल्ह्यात सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू आहे. गेल्या आठ दिवसांचा विचार करता चांदीच्या भावात दोन हजारांची घट झाली होती, तर सोन्यात १०० रुपयांची वाढ झाली होती.