जळगाव: जिल्ह्यात जनावरांना लंपी आजाराची लागण झाल्याने आतापर्यंत ७२ पशूधन दगावले असून, इतर पशूधनांवर उपचार सुरू आहेत. मात्र, लंपीची साथ आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाचा पोळा घरगुती वातावरणात साजरा करावा, सामूहिक बैलपूजन, पोळा फुटणे, बैलांच्या शर्यती असे कार्यक्रम घेऊ नयेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.