चोपडा- तालुक्यातील खैऱ्यापाडा बोरमडी या दुर्गम डोंगराळ भागातील एका आदिवासी महिलेची प्रसूती गेल्या २१ जूनला भररस्त्यावर झाली. वैजापूर आरोग्य केंद्र अवघे ५०० मीटर अंतरावर असताना पोटात जोराची कळ आली अन् रस्त्यातच महिला प्रसूत झाली. घटनेची माहिती मंगळवारी (ता.२७) मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा वैद्यकीय पथकासह खैऱ्यापाडा बोरमडी येथे भेट देत संत्राबाई बन्सीलाल पावरा (वय २४) या महिलेची विचारपूस केली.