वसतिगृहातील महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

आशादीप महिला वसतिगृहातील महिलांना बुधवारी मकर संक्रांतीनिमित्त साड्या वाटप करण्यात आल्या. तसेच संगीतखुर्चीसह विविध खेळ खेळुन आनंदोत्सव साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात आले. 

जळगाव : निमजाई फाऊंडेशनतर्फे आशादीप महिला वसतिगृहातील महिलांना बुधवारी मकर संक्रांतीनिमित्त साड्या वाटप करण्यात आल्या. तसेच संगीतखुर्चीसह विविध खेळ खेळुन आनंदोत्सव साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात आले. 

निमजाई फाऊंडेशनतर्फे आशादीप महिला वसतिगृहात मकरसंक्रांती निमित्ताने हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर निमजाई फाउंडेशन अध्यक्षा शीतल पाटील, सचिव भूषण बाक्षे, वसतिगृहाच्या अधिक्षीका रंजना झोपे यांची उपस्थिती होते. वसतिगृहात आश्रयास असलेल्या महिलांना शीतल पाटिल यांच्या हस्ते हळदी कुंकु करुन साड्यांचे वाटप केल्या. तर अधीक्षिका झोपे यांनी वसतिगृहातील महिलांसह वसतिगृहाच्या कामकाजाची माहिती दिली. तर शीतल पाटील यांनी निंमजाई फाऊंडेशनच्या सामाजिक तसेच शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन किशोर पाटील यांनी केले. 

आर्वजून पहा : "पावनखिंड' पोवाड्याने अंगावर उभे केले शहारे
 

महिलांना रोजगाराचे प्रशिक्षण 
निमजाई फाऊंडेशन या महिलांसोबत असून येथील महिलांना कौशल्यविकास कार्यक्रमांतर्गत फॅशन डिझायनिंग तसेच ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देणार आहे. तसेच त्यांना स्वःताच्या पायावर उभे राहून रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रयत्नशील करत होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgoan marathi news ashadip hostel women help nimjae foundeshen