राज्यानंतर जिल्हा परिषदेतही "शिवआघाडीची' सत्ता! 

कैलास शिंदे
Monday, 11 November 2019

जळगाव : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या नव्या सत्तासमीकरणाचे गणित सुरू झाले आहे. राज्यात हे नवीन समीकरण झाल्यास जळगाव जिल्हापरिषदेत राज्यातील नवीन समीकरण जुळून भाजपची सत्तेपासून गच्छंती होऊ शकते व पुढील अडीच वर्षे शिवसेनेचा अध्यक्ष होऊ शकतो. मात्र, दोन राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचा एक सदस्य अपात्र असल्यामुळे भाजपच्या नाराज गटाचे सदस्य गैरहजर राहिल्यास हा करिष्मा होऊ शकतो. 

जळगाव : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या नव्या सत्तासमीकरणाचे गणित सुरू झाले आहे. राज्यात हे नवीन समीकरण झाल्यास जळगाव जिल्हापरिषदेत राज्यातील नवीन समीकरण जुळून भाजपची सत्तेपासून गच्छंती होऊ शकते व पुढील अडीच वर्षे शिवसेनेचा अध्यक्ष होऊ शकतो. मात्र, दोन राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचा एक सदस्य अपात्र असल्यामुळे भाजपच्या नाराज गटाचे सदस्य गैरहजर राहिल्यास हा करिष्मा होऊ शकतो. 
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्तेत पेच निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जर राज्यात नवीन सत्तासमीकरण झाल्यास त्याचे परिणाम राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतही उमटण्याची शक्‍यता आहे. जळगाव जिल्हा परिषदेतही त्याचे परिणाम दिसून येणार असून, त्या ठिकाणी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता आहे. कॉंग्रेसच्या चार सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यात पाठिंबा देणाऱ्या कॉंग्रेसच्या सदस्याला भाजपने आरोग्य समितीसभापतीपदही दिले आहे. मात्र आता अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. प्रतीक्षा आहे ती फक्त अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होण्याची. ते जाहीर झाल्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होईल. त्यावेळी नवीन समीकरणात भाजप जिल्हा परिषदेतील सत्तेपासून दूर जाऊ शकतो. 
जिल्हा परिषदेत 69 सदस्य आहेत. त्यात बहुमतासाठी 34 आवश्‍यक असतात. सद्याच्या स्थितीत भाजपकडे 33 सदस्य आहेत. तर सेनेकडे 13, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 15 तर कॉंग्रेसकडे चार सदस्य आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एक-एक सदस्य अपात्र आहे. मात्र, कॉंग्रेसच्या चार सदस्यांच्या पाठिंब्यावर भाजपने सत्ता स्थापन केली आहे. भाजपनेही पाठिंबा देणाऱ्या चार सदस्यांपैकी एका सदस्याला आरोग्य समिती सभापतिपद देऊन सत्तेत सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे सद्यातरी जिल्हा परिषदेत भाजप व कॉंग्रेसचे सरकार आहे. मात्र हे सरकार काठावरचे आहे. भाजपचे 33 व कॉंग्रेस 4 असे 38 सदस्यांचे संख्याबळ होत आहे. तर शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी 32 सदस्य संख्या आहे. बहुमतासाठी 34 सदस्य आवश्‍यक आहेत. शिवसेना व भाजपचा एकेक सदस्य अपात्र असल्यामुळे बहुमताची अडचण असली तरी भाजपच्या सदस्यांपैकी चार सदस्य गैरहजर राहिल्यास बहुमताचे संख्याबळ कमी होऊ शकते. आजच्या स्थितीत भाजपमध्ये खडसे यांचा एक गट पूर्णपणे पक्षावर नाराज आहे. त्या गटाचे सदस्य गैरहजर राहिल्यास जिल्हा परिषदेतही भाजपला दूर ठेवत "शिवआघाडी'चे सरकार येऊ शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jilha parishad jalgaon shivaaghadi bjp back