Dhule : खानदेशात कानबाई उत्सावाची धूम

Newly married couple worshiping the festival of Kanbai Mata.
Newly married couple worshiping the festival of Kanbai Mata.esakal

सोनगीर (जि. धुळे) : धुळे जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक कुटूंबियांकडे आज रविवारी (ता. 7) कानबाई उत्सवाची धूम होती. काल मोठ्या भक्तिभावाने कानबाई मातेचे आगमन झाले. कुटूंबियांच्या पूजनंतर रात्रभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.

नृत्य व फुगड्यांनी रात्र जागविण्याची तयारी ठिकठिकाणी सुरू होती. काही भागात गेल्या आठवड्यात कानबाई उत्सव साजरा झाला. उत्सवाची तयारी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होती. सोमवारी (ता.8) उत्सवाची सांगतानिमित्त कानबाईमातेची वाजत गाजत मिरवणूक निघेल. (Kanbai festival celebrated in Khandesh Dhule Latest Marathi News)

जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला तसेच गेली दोन वर्षे कोरोनामुळे उत्सव झाल नव्हता. त्यापार्श्वभूमीवर यंदा जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात कानबाई- रानबाईचा उत्सवाची धूम आहे. शिक्षण अथवा नोकरीनिमित्त बाहेरगावी वास्तव्यास असलेले नातलग यानिमित्त गावाला आलेले आहेत.

यामुळे गावोगावच्या वातावरणात एक वेगळा आनंद भरलेला आहे. यंदा कानबाई उत्सवाची उत्सुकता हेरून कानबाई देवीचे अनेक नवनवीन गाणी आले आहेत. ते सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. तालुक्यात धुळे, कापडणे, सोनगीर, नेर कुसुंबा, वाडीभोकर, गोंदुर येथे कानबाई उत्सवाची धूम आहे.

Newly married couple worshiping the festival of Kanbai Mata.
बंड झाले, आता थंड झाले?; मनसे आमदार राजू पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना टोला

रोटसाठी भाऊबंदाना आवाहन

कानबाई मातेसाठी प्रसाद म्हणून कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या नावाने मूठभर गहू याप्रमाणे गहू घेतले जातात. त्याच्या पिठाच्या पुरणपोळीचा नैवद्य दाखविला जातो. याला खानदेशी बोलीमध्ये रोट असे म्हटले जाते. हे रोट खाण्यासाठी सर्व भाऊबंदांनाही आवाहन केले जाते. घरातील सगळ्यांनी हे रोट संपविणे गरजेचे असते.

Newly married couple worshiping the festival of Kanbai Mata.
कोरोना नियम शिथिलतेने गणेशमूर्तींना मोठी मागणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com