कापडणे- स्मशानभूमीत प्रत्येकालाच जावे लागते. स्मशानभूमी अपवित्र जागा असल्याचा गोड गैरसमजही आहे. तिथे सर्वच धार्मिक विधी कुणी करीत नाही. भुतपिशाच्च असल्याची अंधश्रद्धा आजही कायम आहे. तिथे कुणी नाश्तापाणी अथवा भोजन करताना आढळतच नाही. मात्र, धुळे जिल्ह्यात एक असे गाव आहे तिथे चक्क स्मशानभूमीतच वर्षातून एकदा भोजनावळ पंगतीची रंगत अख्खा गाव घेतो. तिथे महादेवाचे मंदिरही आहे.