मशिदींमध्येच विहिरी व कूपनलिका! 

malegaon mosque.jpg
malegaon mosque.jpg

नाशिक : मालेगाव शहरात वजू करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था शहरातील शंभरहून अधिक मशिदींमध्येच असून, यासाठी विहिरी खोदण्यात आल्या आहेत. उर्वरित मशिदीत कूपनलिका आहेत. गंभीर दुष्काळाचे वर्षे वगळता मशिदीत पाणीटंचाई जाणवलेली नाही. आजही शहरातील सर्व मशिदीतील नमाजाच्या पाण्याची सोय यातूनच होत असल्याचे येथील मशिदींवर एक लाख अहमद व डॉ. रियाज अहमद यांनी सुरू केलेल्या संशोधनातून दिसून आले आहे. 

मालेगाव शहरात 411 मशिदी...

शहरातील मशिदीत संस्कार होतात. येथील पन्नासपेक्षा अधिक मशिदसाठी दानशूरांनी मोफत तर काहींनी विकत घेऊन जागा दिली. येथील मुश्‍ताक व शब्बीर अहमद या बंधूंनी वडिलांच्या स्मरणार्थ जागा व उत्कृष्ट वास्तूही बांधून दिली आहे. नमाजसाठी जागा अपुरी पडू लागल्यानंतर विहिरींवर स्लॅब टाकून पाण्यासाठी वीजपंप बसवून पाइप काढण्यात आले आहेत. येथील पहिली शाही मशीद 1797 मध्ये सरदार नारोशंकरांच्या सैन्यातील मुस्लिम बांधवांसाठी साकारली. 

प्रत्येक पंथाच्या वेगवेगळ्या मशिदी...

1799 ला गुरबेद मशीद, तर 1839 ला प्रसिद्ध फत्तेह मैदनात भाऊमियॉं मशीद झाली. 
येथील मशिदींची नावेही आगळीवेगळी आहेत. गूळबाजारातील 15 हजार नमाजी नमाज पठण करतील, अशी जामा मशीद सर्वांत मोठी आहे. आमदार मौलाना मुफ्ती या मशिदीचे पेशेइमाम आहेत. बहुमजली असलेल्या येथील खानका बरकतीयासह चार मशिद अखंड दगडातील पिलरवर आहेत. येथील नुरानी मशिदसारखी हुबेहूब मशीद दक्षिण आफ्रिकेत झाली. नुरानी व गुरबेद या दोन मशिदीत नमाज पठणाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना मर्कज मशीद संबोधतात. दशकात पन्नासहून अधिक नव्या मशिदी साकारल्याने शहरात कोठेही रस्त्यावर नमाजपठण होत नाही. शिया, सुन्नी, अहेले हदीस प्रत्येक पंथाच्या वेगवेगळ्या मशिदी आहेत. 

आठवड्याला 20 लाखांची उलाढाल... 

मालेगाव शहरातील 80 टक्के मुस्लिम बांधव दर शुक्रवारी नमाजला जातात. पाच वेळची नमाज न चुकविणारे हजारो बांधव आहेत. शुक्रवारी प्रत्येक नमाजीच्या 10 ते 20 रुपये चंद्यातून किमान चार ते पाच हजार रुपये एका मशिदीत जमतात. आठवड्याला वीस लाखांची उलाढाल होते. यातून बांगी, इमाम यांचे मानधन, वीजबिल व अन्य खर्च होतो. मशिद स्वमालकीच्या, जागा विकत घेऊन किंवा दान मिळालेल्या जागेवरच, एकही मशिद अतिक्रमणित, मोकळ्या भूखंडावर नाही. 


लाल मशिदला वास्तूरचनेचा पुरस्कार...
 
पवारवाडी-इकरा नगरातील मुश्‍ताक व शब्बीर अहमद बंधूंनी बांधलेल्या मश्‍जिदे-अब्दुल-रौफ (लाल मशीद) ला उत्कृष्ट वास्तूरचनेचा पुरस्कार मिळाला आहे. राज्यभरातील मुस्लिम बांधव ही मशीद पाहण्यासाठी येतात. देखणी वास्तू, ग्रीन बिल्डिंग, स्वच्छता, सूर्यप्रकाश व शांतता यामुळे वातावरण प्रसन्न व भारावून टाकते. 

समता, बंधुता, एकतेचा संदेश...

* शहरात सर्वाधिक बांगी व इमाम 
* बांगीला आठवड्याला बाराशे ते पंधराशे, इमामला दीड ते दोन हजार रुपये मानधन 
* फजर, जोहर, असर, मगरीब, इशा या नमाजच्या पाच वेळा 
* शहरात सर्वच मशिदींत रमजान काळात तीस दिवस तरावी-कुराण पठण 
* राज्यातील असंख्य मशिद बांधणारे शहरात दान घेण्यासाठी येतात 
* रमजान काळात सर्वाधिक रक्कम जकात स्वरूपात दान 
* जकात घेण्यासाठी देशभरातील मदरसे, मशिदचे विश्‍वस्त येतात शहरात 
* मंदीच्या काळात मशिदीतून गरिबांना भोजनही 
* जुमाच्या नमाजला इमाम करतात मार्गदर्शन 
* जमील जरवाला यांनी जागा व मशीद बांधून दिली 
* दोन ठिकाणी मंदिर-मशिद शेजारी; यातून समता व एकतेचा संदेश 
* मशिदींची वक्‍फ बोर्डात होते नोंदणी 

देशात तीन लाखांहून अधिक मशीद... 

* जगात ढाका शहरात सर्वाधिक मशीद 
* भारतात भोपाळ शहरात, राज्यात औरंगाबादला सर्वाधिक मशीद. 
* देशातील सर्वांत पहिली मशीद केरळात 
* ताज-उल मशीद (भोपाळ) सर्वांत मोठी 
* शहरातील जामा मशिद सर्वांत मोठी 


देशातील 12 प्रसिद्ध मशीद...
 
जामा (दिल्ली), मक्का (हैदराबाद), ताज-उल (भोपाळ), 
बडा-इमामबाडा (लखनौ), जामा (आग्रा), जमाली-कामली,
कुवेत उल इस्लाम (दिल्ली), आधे दिन का झोनपाडा व जामा (अजमेर),
नगिना (आग्रा), हजरत-बल (जम्मू काश्‍मीर), जामिया (श्रीनगर) 
हेही वाचा>मुलींच्या नावाची लागणार घरावर पाटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com