Khanderao Maharaj Yatra : यंदा महेंद्र मराठे ओढणार बारागाड्या

Khanderao
Khanderaoesakal
Updated on

Nandurbar News : उमर्दे खुर्द (ता. नंदुरबार) येथील श्री खंडेराव महाराज यांची यात्रा अक्षयतृतीयेला (ता. २२) भरणार असून, बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रमही होणार आहे. (Khanderao Maharaj Yatra This year Mahendra Marathe will pull baragadya nandurbar news)

नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथे यंदा श्री खंडेराव महाराज यात्रा भरविण्याचा ग्रामस्थांतर्फे निर्णय घेण्यात आला. २१ व २२ एप्रिल २०२३ ला खंडेराव महाराजांची यात्रा भरण्याचे आयोजन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

२१ एप्रिलला सायंकाळी पाचला ज्या जागेवर बारागाड्या ओढण्यास सुरवात होते, तेथे वाजतगाजत सुवासिनींद्वारे पाण्याचा सडा टाकला जातो. पाचव्या पिढीतील श्री खंडेराव महाराजांचे सेवेकरी महेंद्र मराठे २२ एप्रिलला बारागाड्या ओढणार आहेत. पाच वर्षांपासून जितेंद्र मराठे यात्रेत बारागाड्या ओढत आहेत. यंदा मात्र महेंद्र मराठे बारागाड्या ओढणार आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Khanderao
Onion Subsidy : कांदा अनुदानाच्या अर्जासाठी उसळली गर्दी! वंचितांसाठी अर्ज दखल करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ

महेंद्र मराठे यांचे खापरपणजोबा श्री खंडेरावाचे सेवकरी लकडू मराठे ऐचाळे (ता. साक्री) येथून उमर्दे खुर्द येथे वास्तव्यास आले. त्यांनी बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमास सुरवात केली.

अक्षयतृतीयेला सायंकाळी पाचपासून बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमास सुरवात होते. वाघ्या मुरळी या भोप्प्या यांच्यासोबत वाजतगाजत श्री खंडेरावाचे सेवेकरी पानझोक व मोर पिच्छा घेऊन बारागाड्यांना पाच प्रदक्षिणा घालतात.

बारागाडी होण्यापूर्वी साखळ (नांगरटीची) तोडली जाते. त्यानंतर बारागाड्या ओढल्या जातात. बारागाड्या गावातून गोळा केल्या जातात. सुरवातीला तगतराव, नंतर बारागाड्यांची रचना केली जाते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी नंदुरबारसह परिसरातील धामडोद, दहिंदुले, भालेर, नगाव, तिशी, अक्राळे, वावद,

खोंडामळी विखरण शिंदगव्हाण, काकर्दे आधी गावांतील भाविक खंडेरावाच्या दर्शनासाठी व बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते. यात्रेत लहान मुलांच्या मनोरंजनासाठी पाळणे व पालख्या दाखल झाल्या असून, यात्रेत हलवाई व थंड पेयाची दुकाने थाटली जातात. श्री खंडेराव महाराजांची यात्रा भरत असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

Khanderao
Nandurbar News : हॉस्पिटलच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार; वाहतूक मार्गात बदल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com