Red Chili Production
sakal
कापडणे: खानदेशात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने अक्षरशः कहर केला. सातत्यपूर्ण पाऊस आणि अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीचा थेट फटका मिरची पिकाला बसला असून, परिणामी उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा परिणाम थेट बाजारात दिसून येत आहे. हिरव्या मिरचीचे दर दिवसेंदिवस वाढत असताना ओली लाल मिरची मात्र बाजारातून जवळपास गायब झाली आहे. उपलब्धतेअभावी ओल्या लाल मिरचीचे दर प्रतिक्विंटल दहा हजार रुपयांच्या पुढे गेले असून, कोरड्या मिरचीचे दरही कडाडले आहेत.