जळगाव- केंद्रीय मंत्रिमंडळाने जळगाव ते जालना रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्याने खानदेशचा मराठवाड्याशी ‘कनेक्ट’ सहज होणार आहे. जळगाव ते जालना रेल्वेमार्गामुळे मराठवाड्यातील दळणवळण गतिमान होईल. त्याचबरोबर अजिंठा आणि वेरूळ या जागतिक दर्जाच्या पर्यटनास्थळांवर पोहोचणेही सुलभ होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाल्यावर जमीन अधिग्रहणाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. यामुळे या प्रक्रियेला गती मिळाली.