किसान सन्मान : ५२ हजारावर शेतकरी तिसरा हप्त्याचा प्रतीक्षेत 

सम्राट महाजन
Monday, 9 December 2019

बोरद  : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात ६ हजार रुपये मिळणार आहेत. मात्र जिल्ह्यातील सुमारे ५२ हजारावर शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्याचे २ हजार रुपये खात्यात जमा झालेले नाहीत, त्यामुळे किसान सन्मान योजनेचा तिसरा टप्पा रखडल्याचे चित्र आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करुन शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम जमा करावी अशी, अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. 

बोरद  : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात ६ हजार रुपये मिळणार आहेत. मात्र जिल्ह्यातील सुमारे ५२ हजारावर शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्याचे २ हजार रुपये खात्यात जमा झालेले नाहीत, त्यामुळे किसान सन्मान योजनेचा तिसरा टप्पा रखडल्याचे चित्र आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करुन शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम जमा करावी अशी, अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. 

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर २ हजार रुपये प्रमाणे तीन टप्प्यात वर्षाला ६ हजार रुपये जमा केले जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा, नवापूर, अक्राणी, शहादा व नंदुरबार तालुक्यातील सुमारे १ लाखावर शेतकऱ्यांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तलाठ्यांकडे भरुन दिले आहेत. सदर अर्जांची तपासणी करुन पात्र असलेल्या जिल्ह्यांतील ८८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर पहिला टप्प्याचे २ हजार व ८५ हजार शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याचे २ हजार रुपये देण्यात आले आहेत. मात्र तिसऱ्या टप्प्याचे २ हजार आजपर्यंत फक्त ३६ हजार शेतकऱ्यांचा खात्यावर जमा करण्यात आले आहेत.अनेक महिन्यांचा कालावधी लोटला तरीही जिल्ह्यातील ५२ हजारावर शेतकरी अद्यापही तिसऱ्या टप्प्याचा लाभाचा प्रतीक्षेत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील किसान सन्मान योजनेचा तिसरा टप्पा रखडला आहे. यांसाठी निधीची कमतरता, कागदपत्रांची पूर्तता अथवा इतर जी काही कारणे असतील त्यावर प्रशासनाने मार्ग काढून लवकरात लवकर तिसऱ्या टप्प्यातील निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करावे अशी ,अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. 

त्रुटी असलेल्या अर्जांच्या लवकर निपटारा व्हावा :- 
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळावा यांसाठी आजपावेतो नंदुरबार जिल्ह्यातून जवळपास १ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांपैकी अजूनही साधारणतः १३ ते १५ हजार शेतकऱ्यांना काही ना काही कारणास्तव पहिला व दुसरा टप्प्याचा निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या अर्जांमध्ये कागदपत्रांची त्रुटी आहे अशा शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन प्रशासनाने त्यांनाही लवकरात लवकर या योजनेचा तीनही टप्प्याचा लाभ द्यावा अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटतं आहे. 

नक्‍की पहा > दहा कोटींचा "शान' 

नंदुरबार जिल्ह्यातील तालुकानिहाय निधी प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ( हजारांमध्ये ) :- 

तालुका पहिला टप्पा दुसरा तिसरा 
अक्कलकुवा १३१८६ १२९७२ ७२०० 
अक्राणी ७४६४ ७२८२ २५७७ 
नंदुरबार १८११८ १७५७९ ७६४५ 
नवापूर १७८९३ १६७८६ ९३०४ 
शहादा २२४१७ २१०६६ २८९२ 
तळोदा ९२९१ ८६५५ ६३३४ 
एकूण ८८४५१ ८४४२२ ३६०२४ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kisan sanman yojna nandurbar district 52 thousand farmer