Video : दहा कोटीचा 'शान' 

रमेश पाटील
Sunday, 8 December 2019

सारंगखेडा येथील यात्रोत्सवानिमित्त भरणाऱ्या अश्व बाजार हा देशाचा घोडे बाजाराचे नेतृत्व करते. या अश्व बाजाराला चेतक फेस्टिव्हलची जोड मिळाली आहे. अश्व बाजारात तीन हजार अश्व येतात. त्यांपैकी पाचशेहून अधिक अश्वांची किंमत लाखावर असते.

सारंगखेडा : लाखोंची कार किंवा घरांच्या किमंतीपेक्षाही जास्त महत्व आता काही प्राण्यांना आले आहे. त्यांची किंमत कधी ऐकली तर विश्‍वासच बसणार नाही, मात्र हा, ते वास्तव आहे. लक्झरी कारपेक्षाही मोठी किंमत आहे ती शान नावाचा घोड्याची. तब्बल दहा कोटीचा हा घोडा आहे तर तीन कोटीचा भीम नावाचा रेडा असून दोघीही सारंगखेडा यात्रेत दाखल होत आहेत. त्यासाठी त्यांची स्वतंत्र व्ही.आय.पी. व्यवस्था आयोजकांकडून केली जात आहे. हे दोन्ही यात्रेचे विशेष आकर्षण ठरणार आहेत. 

हेही पहा > "पी. एम. किसान'पासून 70 टक्‍के शेतकरी वंचित 

सारंगखेडा येथील यात्रोत्सवानिमित्त भरणाऱ्या अश्व बाजार हा देशाचा घोडे बाजाराचे नेतृत्व करते. या अश्व बाजाराला चेतक फेस्टिव्हलची जोड मिळाली आहे. अश्व बाजारात तीन हजार अश्व येतात. त्यांपैकी पाचशेहून अधिक अश्वांची किंमत लाखावर असते. आत्तापर्यंत अश्व बाजारात दोन कोटी रुपये पर्यत किमतीचा घोडा आलेला आहे. यंदा मात्र त्या किमतीचा विक्रम मोडणार आहे. भारतातील अश्व चॅपियन शान नावाचा अश्व ज्याची किंमत आहे. तब्बल दहा कोटी रुपये. हा आशिया खंडातील अलिशान नावाचा अश्वाचा नातू व शानदार नावाचा अश्वाचा मुलगा आहे. हा पंजाब राज्यातून पटीयाला येथून येणार असून याची उंची ६ फुट ६ इंची इतकी आहे. येथील चेतक फेस्टिव्हल प्रांगणांत व्हीआयपी कक्षात त्याची ५० बाय ५० च्या जागेवर राजेशाही थाटात राहण्यासाठी व्यवस्था केली जात आहे. 

अवश्‍य वाचा > नंदुरबारच्या तरूणाने बनविला "रहस्य'पट 

भीम नावाचा रेडा ही येणार 
यंदा या अश्व बाजारात आकर्षणाचा विषय आहे. अश्वाबरोबर रेडाही येथे दाखल होणार आहे. राजस्थान राज्यातून अहमदाबाद येथील जवाहर जहागीर यांचा भीम नावाचा रेडाची किंमत तीन कोटी रुपये आहे. या रेड्याचे पीळदार शरीर सहा वर्षाचा आहे. या रेड्याचे वजन एक हजार तीनशे किलो आहे. याची उंची आठ फुट आहे. त्यांच्या खाण्यापिण्यासह देखरेखीवर महिन्याला पन्नास हजार रुपये खर्च आहे. त्याचा साठी ५० बाय ५० च्या जागेवर व्यवस्था केली जात आहे. दोघीही प्राणी अश्व बाजारात आकर्षण ठरणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sarangkheda chetak festival ten carrore shan horse