त्या नराधामाला फाशी द्या- कुऱ्हा येथे कॅंडल मार्च 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 जानेवारी 2020

हत्या करणाऱ्या पापी नराधमांचा शोध घेऊन त्यांना फाशी द्यावी. तसेच या प्रकरणाची सी.आय.डी.चौकशी करावी करण्यात यावी. 

कुऱ्हा (मुक्ताईनगर): बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्‍यातील येथील सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यीनीचे अज्ञात नराधमांनी 13 जानेवारी रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या केली होती. तिची हत्या करून मृतदेह मध्यप्रदेशातील नेपानगर जवळ रेल्वे रुळाच्या बाजूला फेकून दिला होता. 

या घटनेच्या निषेधार्थ कुऱ्हा (ता.मुक्ताईनगर) येथे सोमवारी संपूर्ण गावकऱ्यांनी कॅंडल मार्च काढून शांततेच्या मार्गाने संपूर्ण गावातून निषेध रॅली काढली या रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर करण्यात आला यावेळी सर्व गावकऱ्यांच्या वतीने मृत विद्यार्थीनीच्या अपहरण करून हत्या करणाऱ्या पापी नराधमांचा शोध घेऊन त्यांना फाशी द्यावी. तसेच या प्रकरणाची सी.आय.डी.चौकशी करावी करण्यात यावी अशी मागणी अशी मागणी यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी केली. 
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kurha marathi news kandal march Hang Naradhama