Dhule Labor Shortage: शेती करावी की नको? न्याहळोदसह परिसरात मजुरांची टंचाई

As laborers are not available, farmers are using herbicides, laborers spraying herbicides in Narayan Jere's field.
As laborers are not available, farmers are using herbicides, laborers spraying herbicides in Narayan Jere's field.esakal

Dhule Labor Shortage : येथे व परिसरात शेतीकामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांसाठी भटकंती करावी लागत आहे. (Labor shortage in area including Nyahlod dhule News)

पावसाची रिपरिप सुरू असल्याने पिकांनाही व तणालाही पोषक ठरत आहे. यामुळे शेतात भरगच्च तण झाले असून, मजूर मिळणे कठीण झाले आहे.

येथे आदिवासी वस्तीत मुकदम ठरवून दिले असल्याने योग्य त्याच ठिकाणी मजूर पाठविण्यात येतात. निंदणीसाठी मजुरी तीनशे रुपये, भुग्ले उचलणे सहाशे रुपये व मुकादमाला दहा मजुरांमागे एका मजुराचा रोज द्यावा लागतो व मजुरांना शेतात सोडण्यासाठी स्वतंत्र ४०० ते ५०० रुपयांचे वाहन घेऊन जावे लागते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

As laborers are not available, farmers are using herbicides, laborers spraying herbicides in Narayan Jere's field.
Dhule News: मंडोरे परिवारातर्फे क्षयरुग्णांना पोषण आहार! PM टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत मदत

एवढ्या सुख-सोयी मजुरांसाठी असूनदेखील मजुरी मिळत नसल्याने कपाशी, मका व सोयाबीन आदी पिके तणामध्ये बुडून चालली आहेत. शेती करावी की सोडून द्यावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

काही शेतकऱ्यांनी एक कोळपणी केली असून, काही शेतकऱ्यांनी जास्त तणामुळे शेती सोडून दिली आहे. महागडी मजुरी, दहा मजुरांमागे एक मजुरी फुकट द्यावी लागते, वाहन शेतापर्यंत पोचून नेण्यासाठी इतरत्र भुर्दंड यामुळे शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे.

काही शेतकरी तणनाशकाचा उपयोग करीत असले तरी शंभर टक्के तण जात नसल्याने निंदणी करावीच लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना खेडोपाडी मजुरांसाठी भटकंती करावी लागत आहे.

As laborers are not available, farmers are using herbicides, laborers spraying herbicides in Narayan Jere's field.
Nashik Rain Update: बोरखिंड, कोनांबे धरण ओव्हरफ्लो! शेतकरी सुखावला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com