Nashik Rain Update: बोरखिंड, कोनांबे धरण ओव्हरफ्लो! शेतकरी सुखावला

Konambe Dam was full at 6 pm on Sunday.
Konambe Dam was full at 6 pm on Sunday.esakal

Nashik Rain Update : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बोरखिंड व कोनांबे ही दोन्ही धरणे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. बोरखिंड धरण पाच ते सात दिवसांपूर्वी भरले होते, तर कोनांबे धरणातून रविवारी सहाच्या दरम्यान पाणी पडण्यास सुरवात झाली.

बोरखिंड व कोनांबे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने साठ्यात वाढ झाल्याने ते ओव्हरफ्लो झाले. (Borkhind Konambe Dam overflow farmer happy Nashik Rain Update)

धरणातील साठ्याने परिसरातील बळीराजाला दिलासा मिळाला आहे. याशिवाय स्थानिक पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळणार असून, म्हाळुंगी आणि देवनदीचे उगमस्थानात तीन-चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे.

त्यामुळे कोनांबे धरणात पाण्याची आवक वाढली. कोनांबे धरणाची एकूण साठवण क्षमता ५४.५० दलघफू, तर बोरखिंडची क्षमता ५५.६५ दलघफू आहे. सध्या देवनदीसह ठाणगावजवळच्या म्हाळुंगीला पाणी आले आहे.

कोनांबे धरणातून राबविण्यात आलेल्या भाटवाडीसह आठ गावे पाणीयोजनेला संजीवनी मिळणार आहे. धरणांच्या लाभक्षेत्रातील बळीराजालाही दिलासा मिळाला आहे.

गेल्या आठवड्यात म्हाळुंगी नदी दुधडी वाहू लागल्याने भोजापूर धरणात पाणी पोचले आहे. भोजापूर धरणावर मनेगावसह १६ गावे आणि कनकोरीसह पाच गावे पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे.

त्यामुळे या गावातील पाणीटंचाई मिटण्यासाठी भोजापूर धरणात पाण्याची आवक वाढणे अपेक्षित आहे. भोजापूर धरणात जवळपास ५० टक्के साठा झाला आहे. कोनांबे धरणामुळे देव नदीचे पाणी प्रवाहित झाल्याने पूर्व भागातील गावांना संजीवनी मिळणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Konambe Dam was full at 6 pm on Sunday.
Jalgaon Rain Update: निंबादेवी धरण झाले ‘ओव्हरफ्लो’! पर्यटकाना प्रवेशबंदी असूनही हौशी पर्यटकांची गर्दी

पूर्व भागात पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा चिंतातुर होता. पण कोनांबे धरणातून पाणी वाहू लागल्याने पिकांना संजीवनी मिळणार आहे व विहिरींना पाणीही वाढणार आहे. पुढील आठवड्यात भोजापूर धरण भरेल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली.

सरदवाडी, उंबरदरी धरण कोरडेच

भोजापूर, कोनांबे, बोरखिंड, ठाणगाव, सरदवाडी ही धरणे गेल्या वर्षी लवकर ओतप्रोत भरली होती. पण यावर्षी यामधील सरदवाडी धरण व उंबरदरी धरण अजून भरलेले नसल्याने त्यावर अनेक गावांचा पाणी प्रश्न अवलंबून आहे.

भोजापूर धरणावर मनेगावसह १६ गावे, कणकोरीसह गावे, उंबरदरी धरणावर ठाणगावसह पाच गावे, सरदवाडी धरणावर चार गावे, बोरखिंड धरणावर चार गावे अवलंबून आहेत.

Konambe Dam was full at 6 pm on Sunday.
Dhule News: मंडोरे परिवारातर्फे क्षयरुग्णांना पोषण आहार! PM टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com