Dhule News : उच्चदाब वीजवाहिनी अभावी अतिदक्षता विभाग ओसाडच; धुळे ‘सिव्हिल’ची स्थिती

A delegation of Yuva Sena in discussion with the District Surgeon regarding the problems in Civil.
A delegation of Yuva Sena in discussion with the District Surgeon regarding the problems in Civil.esakal

Dhule News : सार्वजनिक आरोग्य मंत्रालयांतर्गत येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील (सिव्हिल) ढिसाळ कारभारामुळे रुग्णांच्या हालअपेष्टांना पारावार उरलेला नाही.

त्यात कोट्यवधींच्या निधीतून साकारलेला अतिदक्षता विभाग उच्चदाब वीजवाहिनीची सुविधा नसल्याने अनेक महिन्यांपासून ओसाड पडल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा युवासेनेने उजेडात आणला. (lack of high pressure power line in Intensive care unit dhule news )

याप्रश्‍नी युवासेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर यासह विविध समस्या युद्धपातळीवर सोडविण्याची ग्वाही जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.

माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्देशानुसार शासकीय रुग्णालयातील स्थितीबाबत युवा सेनेने पाहणी केली. यात सिव्हिल आणि हिरे मेडिकलच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाचा समावेश होता.

दोन्ही ठिकाणी ढिसाळ कारभारामुळे रुग्णांच्या हालअपेष्टांना पारावार उरला नसल्याचे चित्र समोर आले, असे सांगत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख हरीश माळी, उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे, महानगरप्रमुख सिद्धार्थ करनकाळ, मनोज जाधव, सिद्धेश नाशिकर, उपमहानगरप्रमुख जयेश सोनवणे, जयेश फुलपगारे यांनी दिलेली माहिती अशी:

हिरे मेडिकलची स्थिती

हिरे मेडिकलच्या जिल्हा रुग्णालयात औषधांचा मुबलक साठा असूनही केवळ योग्य वाटप व्यवस्थेअभावी रुग्णांना दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागते. दिवसभरात तेथे शेकडो रुग्ण येत असूनही केवळ तीन फार्मसिस्ट आहेत. त्यात रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी आहे.

A delegation of Yuva Sena in discussion with the District Surgeon regarding the problems in Civil.
Dhule News : उपविभागीय अधिकारी महाविद्यालयांमध्ये करार; विद्यार्थ्यांमार्फत ‘महसूल’च्या योजना तळागाळापर्यंत

तसेच या ठिकाणी एमआरआय, सीटी स्कॅन व इतर अनेक उपकरणे देखभाल-दुरुस्तीअभावी बंद आहेत. त्याबाबत रुग्णालय व्यवस्थापन समाधानकारक माहिती देऊ शकले नाही. या स्थितीत रुग्णांना हाल सोसावे लागत आहेत. ही स्थिती सुधारावी.

सिव्हिलमधील प्रकार

जिल्हा शासकीय रुग्णालयात एकच सोनोग्राफी मशिन आहे. त्यासाठी रुग्णांना सरासरी दहा दिवसांपेक्षा जास्त कालावधीची तारीख तपासणीसाठी दिली जाते. त्यात वशिलाही चालतो. सामान्य रुग्णांचे मात्र हाल केले जातात. उच्चदाब वीजवाहिनीअभावी अतिदक्षता विभाग धूळखात पडला आहे.

ही सुविधा अद्याप झालेली नाही. वास्तविक, हा विभाग दोन ते तीन महिन्यांपासून पूर्ण झाला आहे. त्याचे काम दोन वर्षांपासून सुरू होते. तरीही विजेची सोय का नाही, हा गंभीर प्रश्‍न आहे. ही सुविधा उपलब्धतेसाठी टाळाटाळ का होत आहे? युवा सेनेच्या पाहणीतील समस्या लवकर मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा पत्रकाद्वारे दिला गेला.

A delegation of Yuva Sena in discussion with the District Surgeon regarding the problems in Civil.
Dhule Teacher Protest : राज्यातील दीड हजारावर विशेष शिक्षकांचे उपोषण; खानदेशातील शिक्षकही सहभागी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com