Latur Crime News
esakal
लातूरच्या पेठ गावात तरुण-तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्रेमप्रकरणातून आत्महत्येचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला आहे.
लातूर : लातूरमधील पेठ गावच्या शिवारात बीड जिल्ह्यामधील तरुण-तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (Latur case) घटना रविवारी (ता. १९) घडली. मृतांमध्ये नितीन संदीपान दराडे (वय २९) आणि राणी मालाबा दराडे (वय २४, दोघेही रा. दराडवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड) यांचा समावेश असून, त्यांनी प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.