आमच्या नेत्यासोबतच कायम साथ : आमदार अनिल पाटील 

उमेश काटे
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

अमळनेर : आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबतच असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच आमचे नेते आहेत. सर्व आमदारांसमवेत मुंबई येथील ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये आहोत, अशी माहिती अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

अमळनेर : आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबतच असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच आमचे नेते आहेत. सर्व आमदारांसमवेत मुंबई येथील ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये आहोत, अशी माहिती अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 
अनिल पाटील म्हणाले, की अजित पवार हे आमचे विधिमंडळाचे गटनेते असल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून आम्ही राजभवनात शपथविधीसाठी गेलो होतो. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. अनाकलनीय राजकीय घडामोडींनंतर आता आपण मुंबई येथे परतलो आहोत. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व आमदारांसमवेत असून, पक्ष नेतृत्वाच्या सूचनेवरूनच आपली वाटचाल राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अजित पवार हेही आपले नेते असून, आता व भविष्यातही ते राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत राहतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. 

कार्यकर्त्यांनी घेतली भेट 
आमदार अनिल पाटील आज सकाळी मुंबई येथे हॉटेलला पोहचल्यानंतर अमळनेर येथील कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी राजकीय घडामोडींविषयी सविस्तर चर्चाही करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शिवाजीराव पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, प्रवीण पाटील, बाळू पाटील, गौरव पाटील, सुनील शिंपी, भूषण भदाणे, कल्पेश गुजराथी, हिंमत पाटील आदी उपस्थित होते. जनतेला जो कौल दिला आहे त्याचा आदर केला जाईल. आमदार अनिल पाटील हे जनतेशी व मतदारसंघाशी प्रामाणिक असून, अमळनेर मतदारसंघात पसरलेल्या अफवांवर कोणीही विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन सचिन पाटील यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leader sharad pawar rashtrawadi MLA anil patil