बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

दिगंबर पाटोळे
रविवार, 9 सप्टेंबर 2018

वणी (नाशिक) : परमोरी शिवारात तीन वर्षीय बालकाची बिबट्याने केलेल्या हल्ल्यात झालेल्या मृत्युची घटना ताजी असतांनाच दहिवी शिवारात ता.८  रोजी पहाटेच्या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन बकऱ्या ठार झाल्या आहेत.

वणी (नाशिक) : परमोरी शिवारात तीन वर्षीय बालकाची बिबट्याने केलेल्या हल्ल्यात झालेल्या मृत्युची घटना ताजी असतांनाच दहिवी शिवारात ता.८  रोजी पहाटेच्या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन बकऱ्या ठार झाल्या आहेत.

दहीवी, ता. दिंडोरी शिवारातील निवृत्ती सोनू पवार यांच्या शेेेतजमिनीत असलेल्या घरालगतच्या पडवीत बांधलेल्या दोन बकऱ्या ता. ८ रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान बिबट्यानेे हल्ला करत ठार केल्या. यावेळी बिबट्याने शेळ्या ओढून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु शेळ्या बांधलेल्या असल्यामूळे तसेच कुत्र्यांच्या भुकण्यांमूळे बिबट्याने पलायन केले. पंधरा दिवसांपुर्वी निवृत्ती पवार यांच्याच गोठ्यात बांधलेला गोऱ्हा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाला होता.

दरम्यान घटनेची माहिती पोलिस पाटील भास्कर सातभाई यांनी वनविभाग व पोलिसांत दिल्यानंतर वन विभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा करीत परीसराची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी व परीसरातील शेतकरी बांधवांनी संतप्त होत.  बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केेेेली. याची तातडीने दखल घेत वनविभागाने घटनास्थळाच्या परीसरात पिंजरा व कॅमेरा बसविला असून वन कर्मचारी देखरेखीसाठी कर्मचारी तैनात केले आहे. दरम्यान परमोरी व दहीवी शिवारात बिबट्याचे नागरीकांना वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन होत असल्याने परीसरात दहशतीचे वातावरण असून रात्री आठ नंतर घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. तसेच शेतात काम करण्यासाठी बिबट्याच्या दहशतीने मजुरही येत नसल्याने शेतकरी दुुुुहेरी चितेंत सापडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard attack two goats killed