Nandurbar Leopard News: बिबट्या आला हो ‘उपचारा’ला...! शहाद्यातील आदित्य रुग्णालयात अडीच तास थरार

A leopard trapped in the back of the hospital and Imprisoned leopard.
A leopard trapped in the back of the hospital and Imprisoned leopard.esakal

Nandurbar Leopard News : शहरातील डोंगरगाव रस्त्यावर असलेल्या आदित्य रुग्णालयात मंगळवारी (ता. १२) सकाळी बिबट्याने प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली. शहरात प्रथमच बिबट्या, तोही थेट रुग्णालयात शिरल्याने रुग्णांसह नातेवाइकांमध्ये घबराट पसरली. वन विभाग व वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या शिताफीने बिबट्याला पिंजऱ्यात बंद केले.

सकाळी साडेआठपासून सुरू झालेल्या बिबट्याचा थरार वन विभागाने लावलेल्या जाळ्यात तो अडकल्यावर साडेअकरादरम्यान संपला अन रुग्ण, नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, शहरात प्रथमच अशी घटना घडली असून, नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (leopard entered in Aditya Hospital on Dongargaon Road in Shahada nandurbar news)

शहरातील डोंगरगाव रोड परिसरात आदित्य रुग्णालय असून, सकाळी सुमारे एक वर्षाच्या बिबट्याने तेथे प्रवेश केला. रुग्णालयात बिबट्या घुसल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना समजल्याने त्यांनी त्वरित बिबट्या शिरलेल्या भागातील प्रवेशद्वाराचा दरवाजा बंद केला, त्यामुळे बिबट्याला बाहेर पडण्याचे सर्वच मार्ग बंद झाल्याने तो रुग्णालयाच्या मागील भागात अडकून पडला. ही माहिती रुग्णालयाच्या संचालिका डॉ. मेघना पाटील यांनी वन विभागास त्वरित कळवली.

तोपर्यंत शहरात बिबट्या घुसल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतल्याने गर्दी वाढली. काही क्षणातच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सोबतच शहादा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीही आले. बिबट्याला पाहण्यासाठी रुग्णालयाच्या परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्यासह पोलिस पथकाने गर्दीला पांगवत नियंत्रण आणले.

बिबट्या जाळ्यात अडकताच सर्वांना हायसे वाटले. उपवनसंरक्षक भवर, सहाय्यक उपसंरक्षक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल एम. डी. चव्हाण, वनपाल गणेश नगराळे, विजय मोहिते, तसेच शहादा, तोरणमाळ, राणीपूर वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. उपविभागीय पोलिस अधिकारी पवार, पोलिस निरीक्षक बुधवंत, सहाय्यक निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह मोहिते यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला.

A leopard trapped in the back of the hospital and Imprisoned leopard.
Leopard : बिबट्यांची वाढती संख्या आणि हल्ले रोखण्यासाठी बिबट प्रजनन नियंत्रण करावे - खासदार डॉ. अमोल कोल्हे

धडपडीचे ते अडीच तास...

वन विभागाने नंदुरबारच्या वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य व कार्यकर्त्यांशी संपर्क साधून बिबट्याला पकडण्यासाठी योजना आखली. सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी बिबट्या रुग्णालयात शिरल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. नऊपासून बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली.

बिबट्या शौचालयात गेल्यावर रुग्णाच्या नातेवाइकांनी त्वरित गेट बंद केले, त्यामुळे बिबट्या कॉरिडॉरमध्ये अडकून पडला होता. वन विभागाच्या पथकाने आजूबाजूला जाळी लावत सापळा तयार केला. मोठ्या परिश्रमानंतर सकाळी साडेअकराला बिबट्या पिंजऱ्यात अडकला. पिंजऱ्यात बिबट्या अडकताच सर्वच नागरिकांकडून टाळ्यांचा कडकडाट करीत सुटकेचा निःश्वास सोडण्यात आला.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

शहादा शहरात प्रथमच बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये घबराटीसह बिबट्याला पाहण्याची उत्सुकता दिसून येत होती. बिबट्या शहरात आल्याचे कळताच परिसरातील वसाहतीतील नागरिकांनी आपापली दारे त्वरित बंद करून घेतली. नागरिकांना सावध राहण्याचे आवाहनही करण्यात आले. पकडलेल्या बिबट्याला उपवनसंरक्षक कार्यालयाच्या आवारात नेल्यावर त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागातर्फे देण्यात आली.

हा बिबट्या एक वर्षाचा असून, त्याचे वजन ७० किलो असल्याचेही सांगण्यात आले. सावजाच्या शोधार्थ वाट चुकत तो शहरात घुसला असावा, असे वन विभागातर्फे सांगण्यात आले. बिबट्या शहरात आल्याने नागरिकांमध्ये आता घबराटीचे वातावरण पसरले आहे. सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्यांनी सतर्कता बाळगावी, असेही आवाहन करण्यात येत आहे.

A leopard trapped in the back of the hospital and Imprisoned leopard.
Nandurbar Leopard News : अज्ञात वाहनाच्या धडकेने मादी बिबट्याचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com