Leopard footprints in the farm
Leopard footprints in the farmesakal

Nandurbar : बिबट्याने पाडला शेळीचा फडशा

तळोदा (जि.नंदुरबार) : येथील नवीन वसाहत व शाळा लगत असलेल्या एका शेतात काल सोमवारी रात्रीचा सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला करीत तिचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. दरम्यान प्राणिमात्रांवर वारंवार होणाऱ्या बिबट्याचा हल्यामुळे परिसरातील शेतातील रखवालदार व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे. (leopard killed goat at taloda nandurbar news)

तळोद्यातील महावीर नगर शेजारील टेलिफोन ऑफिसचा जवळ येथील काका शेठ गल्लीतील रहिवासी प्रशांत सुपडू मगरे यांची शेती (गट नंबर २५१) आहे. सदर शेतात सोमवारी (ता. १३) रोजी रात्री २ ते २.३० च्या सुमारास अचानक बिबट्याने शेतात बांधलेल्या शेळीवर हल्ला करून शेळीला ठार मारले.

दरम्यान याचं परिसरात नेमसुशील विद्यामंदिर ही शाळा असून दिवसभर याठिकाणी मुलांची वर्दळ असते. तसेच रहिवासी परिसर असल्याने याठिकाणी नागरिकांचा मोठ्या संख्येने वावर असतो. या परिसरातील शेतांमध्ये अनेकदा बिबट्यांनी कुत्रे, वराह, शेळ्या यांना आपले लक्ष करीत ठार मारले आहे.

Leopard footprints in the farm
Nashik Rain Update : मुसळधार पावसाने दमनगंगा दुथडी भरून

वारंवारच्या घटनांमुळे या परिसरातील शेतमालक, रखवालदार, शेतमजूर तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत संबंधित शेतकरी प्रशांत मगरे यांनी तळोद्याचे उपवनसंरक्षक यांना लेखी निवेदन देत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी देखील पिंजरा लावत बिबट्याला जेरबंद करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leopard footprints in the farm
कोठार येथे निर्माल्य संकलन मोहीम; तब्बल पावणे 2 क्विंटल निर्माल्याचे संकलन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com