नवापूरला कुष्ठरोग जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

नवापूर: येथील उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुष्ठरोग जनजागृती रॅली काढण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कीर्तिलता वसावे यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून जनजागृती सप्ताह व रॅलीचे उद्‍घाटन करण्यात आले.

आश्रमशाळेचे मुख्याध्यापक गावित, डॉ. प्रीती गावित व भोये यांची उपस्थिती होती. डॉ. कीर्तिलता वसावे यांनी मार्गदर्शन केले. कुष्ठरोग हा बरा होणारा आजार असून, सरकारी रुग्णालयात मोफत तपासणी व उपचार उपलब्ध असतात. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कुष्ठरोग तंत्रज्ञ सुरेश बागूल यांनी कुष्ठरोगाविषयी तांत्रिक व शास्त्रीय माहिती दिली. सचिन लोहारे यांनी क्षयरोगाविषयी माहिती दिली. 

पपईला हवी हमीभावाची खात्री

समुपदेशक कैलास माळी यांनी एड्सविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी निर्मला गावित, सुभाष गावित, चंद्रकांत पावरा, रायसिंग कुवर यांनी सहकार्य केले. विजय देवकर यांनी सूत्रसंचालन केले. अनेश वसावे यांनी आभार मानले
नंदुरबार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leprosy awareness rally in Navapur