Latest Marathi News | नवापूरला साडेआठ लाखांचा मद्यसाठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nandurbar Crime News : नवापूरला साडेआठ लाखांचा मद्यसाठा जप्त

नवापूर : शहरालगत गुजरात-महराष्ट्र सीमेवर पुन्हा वाहनांसह १२ लाख ३२ हजारांचा अवैध मद्यसाठा पकडण्यात आला असून, चालकासह दोन आरोपी ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई २० नोव्हेंबर पहाटे पावणेसहाच्या सुमारास करण्यात आली.

पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून २० नोव्हेंबर पहाटे पावणेसहाच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ यांच्या सोबत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गुमानसिंग पाडवी, हवालदार दिनेश वसुले, दिनेश बाविस्कर, पंकज सूर्यवंशी, विकी वाघ, प्रशांत खैरनार, रणजित महाले गस्तीवर असताना महेंद्र बोलेरो पिक-अप (एमएच ३९, एडी ११८३)मध्ये दोन व्यक्ती नवापूरकडून गुजरातमध्ये करंजी मार्गाने देशी दारू व बिअरचे खोके घेऊन जाताना खोकरवाडाजवळ झडती घेतली असता सात लाख ३९ हजार २०० रुपये किमतीच्या २२० नग खोक्यांत देशी दारू, ९३ हजार ६०० रुपयांची ३० बिअरचे खोके आढळले.(Liquor stocks worth eight and a half lakh seized from Navapur Nandurbar Crime News)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची...

हेही वाचा: Dhule Crime News : गांजा तस्करीतील आरडे अटकेत; कारसह सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

चार लाखांची महिंद्र बोलेरो पिक-अप, पांढऱ्या रंगाची मोटार (एमएच ३९, ओडी ११८३) असा १२ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईत वाहनचालक अबिदखान सत्तारखान सिकलीकर (वय ३७) व शैलेश कालू राठोड (वय २८, दोघे रा. नवापूर) यांना ताब्यात घेतले. पोलिस शिपाई बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ तपास करीत आहेत.

हेही वाचा: World Fish Day : बंदी असलेल्या माशांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई