Latest Marathi News | गांजा तस्करीतील आरडे अटकेत; कारसह सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Dhule Crime News : गांजा तस्करीतील आरडे अटकेत; कारसह सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे : शिरपूरकडून धुळ्याकडे होणारी गांजाची तस्करी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने रोखली. यात मुंबई-आग्रा महामार्गावर सोनगीरजवळ ढाब्यासमोर कारमधून १४ किलो ३७५ ग्रॅम असा सव्वालाख रुपये किमतीचा गांजा पकडला. या प्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली.

पोलिसपथकाने गांजासह चार लाखांची कार असा सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबई-आग्रा महामार्गावरून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. (Arrested in Ganja Trafficking Property Rs 55 lakh seized along car Dhule News)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची...

हेही वाचा: Nashik Crime News : विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी कलाशिक्षकाला सक्तमजुरीची शिक्षा

याआधारे हॉटेल राजस्थानी ढाब्यासमोर पोलिसपथकाने नाकाबंदी केली. त्या वेळी शिरपूरकडून धुळ्याकडे येणारी कार (एमएच १६, सीक्यू ३६६३) थांबवून तिची झडती घेतली. त्यात गांजा सापडला.

या प्रकरणी हवालदार मयूर पाटील यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आनंदा गणेश आरडे (वय २७, रा. बोरडगाव रोड, नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत.

हेही वाचा: Nashik News : पेठ रोड दुरुस्तीसाठी रहिवासी आक्रमक; NMC, लोकप्रतिनिधीच्या विरोधात घोषणाबाजी