Local Election
sakal
जळगाव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यात सत्तेत असलेल्या पक्षांचे प्रदेशाचे नेते महायुतीबाबत सकारात्मक वक्तव्ये करीत असले तरी ‘ग्राउंड रिॲलिटी’ वेगळी आहे. पाचोऱ्यात भाजप- शिवसेनेचे नेते उघडपणे विरोधात बोलत असून, जळगावात माजी महापौर, नगरसेवकांच्या ‘इनकमिंग’मुळे पालकमंत्र्यांनी थेट गिरीश महाजनांवर वार करत भाजपला ‘वॉशिंग मशिन’ म्हणून डिवचले आहे. गल्लीतील या वास्तवात महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्येच प्रचंड बेबनाव दिसत असून, जळगाव जिल्हा त्याचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे.