Loksabha 2019 : पन्नास वर्षांत निष्ठा गेली खड्ड्यात

लुमाकांत नलवडे
सोमवार, 22 एप्रिल 2019

पन्नास वर्षांतील बदलानंतर आदर्श नेतृत्व राहिले नाही. एका रात्रीत पैशासाठी नेते पक्ष बदलतात. पन्नास वर्षांतील बदलत्या निवडणुकांबाबत गोदावरी काठावरील सतीश शुक्‍ल सांगत होते. गोदावरी काठावर आम्ही अनेकांशी संवाद साधला तेव्हा ‘मसल आणि मनी पॉवर’खाली तत्त्वे दबली आहेत.

पन्नास वर्षांतील बदलानंतर आदर्श नेतृत्व राहिले नाही. एका रात्रीत पैशासाठी नेते पक्ष बदलतात. पन्नास वर्षांतील बदलत्या निवडणुकांबाबत गोदावरी काठावरील सतीश शुक्‍ल सांगत होते. गोदावरी काठावर आम्ही अनेकांशी संवाद साधला तेव्हा ‘मसल आणि मनी पॉवर’खाली तत्त्वे दबली आहेत. कोणतेही सरकार असो भ्रष्टाचार कमी होत नाही. कोण कोणत्याही पक्षात जातो. एका दिवसात निष्ठा सोडून देणारे जनतेचे काय भले करणार, असा सूर व्यक्त केला.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महाआघाडीतून राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ आणि युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे रिंगणात आहेत. त्यांच्या समोर आव्हान उभे करणारे समीर भुजबळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. तसेच भाजपातून काढलेले ॲड. माणिकराव कोकाटे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. प्रा‘माणिक’ असा प्रचार ते करत आहेत.

गोदावरी काठचे दुकानदार, रिक्षाचालक, राजकरणी व्यक्ती यांनी थेट विकासाचे मुद्दे पुढे आणले. 

आदर्श नगरसवेक पुरस्कार मिळवलेले माजी नगरसेवक सतीश शुक्‍ल यांना आम्ही पंचवटीजवळ भेटलो. पन्नास वर्षांत त्यांनी पहिलेले बदल सांगत होते, पूर्वी कार्यकर्ते घरातून पोळी आणत होते. आता त्यांना पाहिजे ती व्यवस्था केली जाते. निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी निवडणूक प्रचारात मोठा बदल करून चांगली शिस्त लावली. पूर्वी नेते एका विचाराचे, तत्त्वाचे असायचे. आता ते एका रात्रीत पैशासाठी पक्ष बदलत आहेत. पूर्वी विचारांवर निवडणूक होत होती. एखादा नातेवाईक पक्षातून दुसऱ्या पक्षात गेला तरीही इतर व्यक्ती त्यांच्या विरोधात प्रचार करीत होत्या. लालकृष्ण अडवानी मंत्री असताना हवाला प्रकरणी एका डायरीत त्यांच्या नावाचा उल्लेख झाला. त्यानंतर त्यांनी स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ते निर्दोष असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी मंत्रिपद स्वीकारले. असे आदर्श नेतृत्व आज पाहवयास मिळत नाही. सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी विभागनिहाय कार्यकर्त्याच्या समित्या नेमून त्यांच्याद्वारे प्रामाणिक काम झाले पाहिजे, असे असेही शुक्‍ल यांना वाटते. 

उड्डाण पूल, रेल्वे उभारणीची कंपनी, बंद पडलेला नाशिक महोत्सव, महिलांच्या बचत गटांसाठी मार्केट यासह इतर विकासाचे मुद्दे येथे चर्चेत आले आहेत. ग्रामीण भागातील तरुणांनाही शेती आणि बेरोजगारीचे प्रश्‍न महत्त्वाचे वाटत आहेत. एकंदरीतच विकासाचे राजकारण येथील उमेदवार करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Reporter Diary Lumakant Nalawade Development