वादळ शमलं; पण पाऊस येणारच... 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात पाऊस कोसळू शकतो, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यात नाशिकपासूनजवळच असलेल्या संगमनेरपासून तर पुणे, सांगली, सातारापर्यंत पावसाची शक्‍यता आहे. हवामान विभागाने बुधवार (ता. 6)पासून, तर येत्या शुक्रवार 8 नोव्हेंबरपर्यंत राज्यात चक्रीवादळाची आणि मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविली होती. त्यानुसार मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाशिक : मध्य महाराष्ट्रावर घोंगावणारं वादळ किनारपट्टीवर येईपर्यंत शमत आहे. समुद्र किनारपट्टीवर येईपर्यंत वादळाची तीव्रता बरीच कमी होणार आहे. मात्र असे असले तरी कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस मात्र येणार आहे. तसेच संगमनेर ते पुण्यादरम्यान पावसाची जास्त शक्‍यता असल्याने नाशिकला पावसाची तीव्रता पुण्याच्या तुलनेत कमी राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

संगमनेर- पुण्यादरम्यानच्या पट्ट्याला तडाखा बसण्याची शक्‍यता 

मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात पाऊस कोसळू शकतो, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यात नाशिकपासूनजवळच असलेल्या संगमनेरपासून तर पुणे, सांगली, सातारापर्यंत पावसाची शक्‍यता आहे. हवामान विभागाने बुधवार (ता. 6)पासून, तर येत्या शुक्रवार 8 नोव्हेंबरपर्यंत राज्यात चक्रीवादळाची आणि मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविली होती. त्यानुसार मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र आता वादळाची तीव्रता शमली आहे. 

पावसाला सुरवात 
मात्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असल्याने जोरदार पावसाची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्रावर घोंगावणारे चक्रीवादळ शमणार असले तरी मध्य महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव मात्र कायम राहणार आहे. पावसाचे केंद्रबिंदू नाशिकऐवजी संगमनेर ते पुण्यादरम्यान राहील, असाही अंदाज आहे. दरम्यान, आजपासून पावसाला सुरवात झाली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरसह काही तालुक्‍यांत पावसाला सुरवात झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Low pressure straps will only cause rain at Nashik