Mahapashudhan Expo 2023 : शिर्डी येथे 'या' तारखांना पशू प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maha Pashudhan Expo 2023 organized at Shirdi from 24 to 26 March 2023 dhule news

Maha Pashudhan Expo 2023 : शिर्डी येथे 'या' तारखांना पशू प्रदर्शन

धुळे : शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत श्रीक्षेत्र शिर्डी (ता. राहता, जि. अहमदनगर) येथे २४ ते २६ मार्च २०२३ या कालावधीत महापशुधन एक्स्पो-२०२३ (Mahapashudhan Expo 2023) चे आयोजन करण्यात आले आहे. (Maha Pashudhan Expo 2023 organized at Shirdi from 24 to 26 March 2023 dhule news)

या पशू प्रदर्शनास धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी भेट देऊन माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले.

प्रदर्शन ४६ एकर एवढ्या विस्तीर्ण जागेवर होणार असून, यामध्ये महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमधील उत्कृष्ट पशुधन, पशुपक्षी सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनातून पशुसंवर्धन विषयातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि शास्त्रोक्त पद्धतीने पशुपक्षी पालन व्यवसाय करण्यासाठी चालना मिळणार आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

जवळपास ६५ प्रकारचे विविध पशुपक्षी जाती विविध स्टॉल्स, संयंत्रे, मुरघास, अझोला, लिंग निर्धारित रेतमात्रा, दूध, मांस, अंडी, लोकर, उत्पादन तंत्रज्ञान माहिती, बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी, विविध शासकीय योजना, वैरण उत्पादन, प्रात्यक्षिके आदींची माहिती प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे. प्रदर्शनामध्ये धुळे जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग व पशुपालक यांचाही सक्रिय सहभाग असणार आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १६) या प्रदर्शनाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या वेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. रमेश शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेंद्र लंघे, सहाय्यक आयुक्त डॉ. अशोक वाडिले, सहाय्यक आयुक्त डॉ. मिलिंद भागे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleanimal