कोरोनाच्या यंत्र साहित्य खरेदीसाठी आमदारांना ५० लाखांचा निधी; शासनाचा निर्णय

सुधाकर पाटील
शनिवार, 28 मार्च 2020

 कोरोनो या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध करण्याकरता करण्यात आलेल्या उपाययोजना करता प्रमाणित केलेल्या इतर वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करता येणार आहे. यामुळे आता तातडीने यंत्रसामुग्री खरेदी करता येणे शक्य झाले आहे.

भडगाव : राज्य शासनाने 'कोविड १९' अर्थात कोरानाच्या प्रतिबंधात्मक यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी आमदार निधीतून खर्च करण्यास मुभा दिली आहे. याबाबतचा आदेश आज (शनिवार) राज्य शासनाने काढला आहे. त्यामुळे जिल्ह्यास्तरावर आमदार निधीतून कोरोना संदर्भातील यंत्रसामुग्री खरेदी करता येणार आहे.
 
सध्या कोरोनेने राज्यातच नव्हे तर देशात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे शासन युध्दपातळीवर विविध उपाययाेजना राबवित आहे. काही जिल्ह्यांमधऊन रुग्णालयांसाठी आवश्यक असलेलेल्या साेयी सुविधांची माहिती देखील घेतली जात आहे. एखादी गाेष्टी हवी असल्यास ती खरेदी करता यावी यासाठी शासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने एकवेळेची खास बाब म्हणून आमदार निधीतून अर्थात स्थानिक विकास निधीतून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक यंत्रसामुग्री व साहित्य खरेदिसाठी खर्च करण्यास सहमती दिली आहे. तसे परिपत्रक शासनाकडून आज (शनिवार) काढण्यात आले आहे.
 

५० लाख खर्च करू शकणार
 
राज्य शासनाने प्रत्येक 'आमदार स्थानिक विकास कार्यक्रम' अंतर्गत २०१९-२०, २०२०-२१ करिता कोव्हीड १९ विषाणुमुळे उध्दभवलेल्या आपत्कालीन परीस्थितीतमध्ये जिल्हास्तरावर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई होण्याच्या दृष्टीने वैद्यकिय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी आमदारांना ५० लाख पर्यंत निधी एक वेळेची विशेष बाब म्हणून उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. आमदारांनी यासाठी शिफारशी केल्यास जिल्हाधिकारी त्यास प्रशासकीय मान्यता देतील. त्यानंतर जिल्हास्तरीय कार्यालये यंत्रणांचे प्रमुख जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी हे वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करू शकतात. 
 
हे यंत्रसामुग्री खरेदी करता येईल
 
या आमदार निधीतून इनफ्रारेड थर्मामीटर, पर्सनल प्रोटेक्शन इक्वीपमेंटस कीट, कोरणा टेस्टिंग किट, आयसीयू वेंटिलेटर आयसोलेशन वॉर्ड व्यवस्था, वैद्यकीय कर्मचाऱ्यांकरिता फेस मास्क, ग्लोव्हज व सॅनीटायझर, आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने कोरोनो या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध करण्याकरता करण्यात आलेल्या उपाययोजना करता प्रमाणित केलेल्या इतर वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करता येणार आहे. यामुळे आता तातडीने यंत्रसामुग्री खरेदी करता येणे शक्य झाले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra State Government Approves Special Fund To MLA For Purchasing Coronavirus Material