
रोहिणी खडसे यांना 36589 मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे बंडखोर व राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना 33370 मते मिळाली आहेत.
मुक्ताईनगर : विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरवात झाली. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे आणि शिवसेनेचे बंडखोर व राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये खरी लढत होत आहे. रोहिणी खडसे यांनी आघाडी घेतली आहे.
रोहिणी खडसे यांना 36589 मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे बंडखोर व राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना 33370 मते मिळाली आहेत. ही लढत जळगाव जिल्ह्यात अत्यंत चुरशीची मानली जात असून, येणाऱ्या फेऱ्यांमधून कुणाच्या बाजूने कल झुकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्याची आकडेवारी
मुक्ताईनगर विधानसभा
रोहिणी खडसे 36589
चंद्रकांत पाटील 33370
नवव्या फेरीत रोहिणी खडसे 32199 मतांनी पुढे