मुक्ताईनगर : भाजपच्या रोहिणी खडसे पिछाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे आणि शिवसेनेचे बंडखोर व राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये खरी लढत होत आहे. रोहिणी खडसे सध्या पिछाडीवर आहेत.

जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरवात झाली. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे आणि शिवसेनेचे बंडखोर व राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये खरी लढत होत आहे. रोहिणी खडसे सध्या पिछाडीवर आहेत.

रोहिणी खडसे यांना पहिल्या फेरीत 3758 मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे बंडखोर व राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना 4062 मते मिळाली आहेत. ही लढत जळगाव जिल्ह्यात अत्यंत चुरशीची मानली जात असून, येणाऱ्या फेऱ्यांमधून कुणाच्या बाजूने कल झुकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

भाजपने या मतदारसंघात खडसेंच्या रुपात सलग सहा निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र, पक्षाने खडसेंना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या कन्या रोहिणी यांना रिंगणात उतरवले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Election Results Muktainagar Trends early morning