नांदगाव : शिवसेनेचे कांदे आघाडीवर पण पंकज भुजबळ...| Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

सुहास कांदे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी पंकज भुजबळ यांच्याविरोधात 13 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. कांदे हे मतमोजणीच्या सुरवातीपासूनच आघाडीवर आहे.     

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघाच्या आणखी एका लक्षवेधी लढतीत शिवसेना महायुतीचे सुहास कांदे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी पंकज भुजबळ यांच्याविरोधात 13 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. कांदे हे मतमोजणीच्या सुरवातीपासूनच आघाडीवर आहे.     

या मतदारसंघातील एक लाख 89 हजार 252 मतदारांनी मतदान केले. एकूण 59.89 टक्के मतदान झाले. 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या मतदानातील टक्केवारी घसरलेली आहे. गेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना-भाजप हे चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले. या वेळच्या निवडणुकीत आघाडी व महायुती झाल्याने मतविभाजन टाळले गेले असे असले, तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत उघडपणाने बेबनाव दिसला नाही.

नांदगाव- नांदगाव विधानसभा निवडणूकीत
नांदगाव विधानसभा निवडणूक - २०१९ अकराव्या फेरी अखेर.. - 
१ ) पंकज भुजबळ ( राष्ट्रवादी ) - ३२०२५
२ ) सुहास कांदे ( शिवसेना ) -  ४५०८२

शिवसेनेचे सुहास कांदे अकराव्या फेरी अखेर १३०५७ मतांनी आघाडीवर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election results Nandgaon Trends afternoon