Dhule Municipal Election
sakal
धुळे: महापालिका सत्तेच्या सारीपाटात महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील विसंवाद निकालातून भाजपच्या पथ्यावर पडला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीकडे शहराध्यक्ष किंवा कार्यकारिणीचा ठोस ‘चेहरा’ नसणे आणि शिवसेनेच्या स्थानिक व वरिष्ठ नेतृत्वात दिसलेली काहीशी उदासीनता, यामुळे भाजपचा वारू रोखण्यात ही युती अपयशी ठरली.