धुळे- शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या खोली क्रमांक १०२ मध्ये सापडलेल्या एक कोटी ८४ लाखांच्या रोकडप्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने सोमवारी (ता.२६) मुख्यमंत्र्यांकडे केली. मागणीचे निवेदन तहसीलदार वैशाली हिंगे यांना दिले.